काय सांगता ! गणेशोत्सवानंतर राज्यातील २७ टक्के सक्रिय रुग्ण एकट्या पुण्यात; नागरिकांना काय आहे आवाहन पाहा…

335 0

पुणे : गणेशोत्सवानंतर पुण्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने नोंदविले आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यात सक्रिय रुग्ण वाढले आहेत. राज्यातील २७ टक्के सक्रिय रुग्ण पुण्यात असल्याची माहितीही खात्यातर्फे रविवारी देण्यात आली.

पुण्यात 9 सप्टेंबरला गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक निघाली. कोरोना उद्रेकात दोन वर्षे ही मिरवणूक निघाली नव्हती. त्यामुळे यावर्षी अनंत चतुर्दशीला निघालेल्या विसर्जन मिरवणुकीला सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. रात्रीही लक्ष्मी रस्त्यासह टिळक, कुमठेकर आणि केळकर रस्त्यावरील मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी झाली होती. गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर नऊ दिवसांनी पुण्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढल्याचे आरोग्य खात्यातर्फे दिलेल्या माहितीतून दिसते.

कोरोना रुग्णांची संख्याराज्यात ३५ जिल्ह्यांमध्ये मिळून चार हजार ५४० सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे एक हजार २२२ म्हणजेच २७ टक्के रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी काय माहिती दिली आहे. नागरिकांनो उत्सवांचा आनंद नक्कीच घ्या मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळा. लक्षणे आढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि चाचणी करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!