#ACCIDENT : रात्रीच्या जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडला; त्यानंतर तरुण घरी परतलाच नाही, कुटुंबावर शोककळा , नक्की काय घडले ?

1258 0

जळगाव : जळगाव मधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. जळगाव मधील समता नगर या ठिकाणी राहणारा तरुण रमेश नाडे वय वर्ष 30 हा रात्री जेवण झाल्यानंतर शतपावलीसाठी बाहेर पडला होता. पण त्यानंतर घरी परत आलाच नाही.

कुटुंबीयांनी रात्री त्याची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह रेल्वे पुलाजवळ आढळून आला . त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान रात्री उशिरा फिरायला गेल्यानंतर त्याला रेल्वेची धडक बसली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, अधिक तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!