#VIDEO : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणते, ” भारतातल्या मुली आळशी, त्यांच्या अपेक्षा अवाजवी…!” तुमचं मत काय ?

1053 0

काळ बदलला तसं मुली देखील स्वतः कमावून आणि घराला हातभार लावणं यास महत्त्व देतात. एकीकडे मुलींनी वेळेत लग्न करावं, मुलं बाळांना योग्य वेळेत जन्म द्यावा असं ज्येष्ठ सांगत असतात तर अनेक जणी आपल्या करिअरला महत्त्व देतात असे देखील समाजाचा एक भाग ओरड करत असतो. आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील तिचं एक परखड मत मांडल आहे.

एका कार्यक्रमांमध्ये बोलत असताना सोनाली कुलकर्णी म्हणाली की, ‘भारतात खूप सार्‍या मुली आळशी आहेत. त्यांना असा बॉयफ्रेंड किंवा नवरा हवा असतो ज्याच्याकडे चांगली नोकरी घर असेल पगार वाढण्याची खात्री असेल पण त्या मुलीत इतकी हिंमत नसते की ती एखाद्या मुलाला म्हणू शकेल की तू माझ्याशी लग्न केल्यावर मी काय करेल ?

तसंच यापुढे बोलताना ती म्हणाली की, तुमच्या घरात अशी स्त्री निर्माण करा जी स्वतःसाठी कमवू शकेल. जी घरात सामान घ्यायचं असेल तर पतीला अर्धे पैसे देऊ शकेल. मला त्यांनी घरात भांडण करावीत असं म्हणायचं नाही. पण महिला तितकी सक्षम असावी असं तिने म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!