पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे.
विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयाने मालिका, नाटक आणि चित्रपट अशा मनोरंजनाच्या तिन्ही क्षेत्रांवर आपले वर्चस्व गाजवले आहे. त्याने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाबरोबरच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केलं आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ट्रॉमा या चित्रपटाचे समीक्षकांनी भरभरून कौतुक केले. 2013 साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. घशाच्या त्रासामुळे विक्रम गोखले यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली.