अभिनेता सुनील शेंडे यांचे निधन, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा

1113 0

मुंबई : आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट सृष्टी गाजणारे जेष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे सोमवारी निधन झाले. गेली बरेच दिवस ते आजारी होते. दीर्घ आजाराने आज त्यांची प्राणज्योत मालवली.

वास्तव या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या मंत्र्याची भूमिका प्रचंड गाजली होती. त्याचप्रमाणे सरफरोश या चित्रपटातही त्यांनी मंत्र्याची भूमिका केली होती. त्यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. मराठी नाटक, चित्रपट तसेच हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये त्यांनी अनेकदा पोलीस इन्स्पेकटरची भूमिका साकारली. त्यांच्या याच भूमिकेसाठी त्यांना अनेकदा पुरस्काराने देखील गौरवण्यात आले गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

Share This News
error: Content is protected !!