पुणे शहरातील स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा सक्रिय सहभाग

294 0

पुणे : पुण्यात होत असलेल्या जी २० परिषदेच्या निमित्ताने जनजागृती त्याचबरोबर नागरिकांच्या सहभागातून सार्वजनिक स्वच्छता करण्याच्या हेतूने पुणे महापालिकेतर्फे आज शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.

महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या प्रांगणात आज सकाळी झाले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, विविध स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहराच्या विविध भागातील महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील १५० हून अधिक ठिकाणी आज ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यात शहरातील प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक स्थानांबरोबरच पर्यटन स्थळे, सार्वजनिक उद्याने, प्रमुख चौकांचा समावेश होता. विविध स्वयंसेवी संस्था आणि संघटनांच्या जोडीने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य पुणेकर नागरिकांनी देखील अतिशय उत्साहाने या मोहिमेत सहभाग नोंदवला होता.

Share This News
error: Content is protected !!