PUNE POLICE : दहीहंडी उत्सवामध्ये गोळीबार करणारा आरोपी आणि टोळीतील 16 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

408 0

पुणे : टोळीचे वर्चस्व निर्माण व्हावे या उद्देशाने आणि अवैध मार्गाने फायदा करून घेण्याच्या उद्देशाने स्वतः किंवा टोळीतील सदस्यांना चिथावून सिंहगड रोड परिसरात मारामारी करणे ,खुनाचा प्रयत्न करणे, कोयता आणि इतर घातक शस्त्रे जवळ बाळगून दंगा करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केलेल्या सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी चेतन ढेबे याच्यासह त्याच्या टोळीतील 16 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

अधिक वाचा : मोठी बातमी : नवरात्र उत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट

दहीहंडीचा उत्सव सुरू असताना आरोपी चेतन ढेबे आणि त्याच्या साथीदारांनी हवेत गोळीबार केला होता. या अचानक घडलेल्या घटनेने परिसरात देखील खळबळ उडाली होती. या आधी देखील या टोळीने केलेले गुन्हे पाहता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाईचे आदेश दिले होते.

अधिक वाचा : Breaking News : शैक्षणिक सहलीला गेलेल्या बसचा आंबेगावजवळ अपघात ; 44 पैकी 7 विद्यार्थी गंभीर जखमी

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आयुक्तालयाचा कारभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे आणि समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना निर्देश दिले आहेत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली या वर्षातील हि 33 वी आणि त्यांच्या पुण्यातील कारकीर्दीतील आत्तापर्यंतची ही 96 वी कारवाई आहे.

Share This News
error: Content is protected !!