पुणे : पुण्यात आपली दहशत निर्माण करू पाहणाऱ्या टोळक्यांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आत्तापर्यंत 97 टोळक्यांवर कारवाई केली आहे. पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागू नये आणि सुरक्षेच्या दृष्टीने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवत प्रतीक उर्फ नोन्या वाघमारे या अट्टल गुन्हेगारासह त्याच्या 11 साथीदारान विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
काही दिवसांपूर्वी सराईत गुन्हेगार तुषार हंबीरराव याच्यावर ससून रुग्णालयामध्ये हल्ला करणारा टोळीप्रमुख प्रतीक उर्फ नोण्या वाघमारे (वय 22) याच्यासह सागर ओव्हाळ (वय 22), बालाजी ओव्हाळ (वय 23), सुरज शेख (वय 19), सागर आटोळे (वय 21), ऋतिक उर्फ बबलू गायकवाड (वय 19) अनिल देवकते (वय 22) गाविल उर्फ समीर आतार (वय 19) प्रकाश रणछोड दिवाकर उर्फ प्रकाश दास रणछोड दास वैष्णव (वय 26) परवेज उर्फ साहिल इनामदार (वय 21) या 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
या टोळीतील तम्मा उर्फ रोहित धोत्रे आणि साहिल शेख हे दोघे फरार आहेत. प्रतीक उर्फनोण्या वाघमारे यांनी आपल्या 11 साथीदारांसह टोळीचे वर्चस्व आणि आपली दहशत कायम राहावी यासाठी आत्तापर्यंत खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण दरोडा घरफोडी जबरी चोरी विनयभंग पळवून नेणे अमली पदार्थ बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत.