लोणी काळभोर पोलीस स्थानकाच्या हद्दीत खंडणी मागून दहशत वाजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

555 0

पुणे : लोणी काळभोर पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार मोन्या उर्फ रोनाल्ड अनिल निर्मळ वय वर्षे 24 या अभिलेखावरील सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची एमपीडीए कायद्यान्वये ही 87 वी कारवाई आहे.

मोन्या उर्फ रोनाल्ड निर्मळ याने त्याच्या साथीदारांसह लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता,चाकू,तलवार यासारख्या जीवघेण्या हत्यारांसह कुणाचा प्रयत्न खंडणी घातक शस्त्रासने दुखापत करणे, दंगा बेकायदा हत्यार बाळगणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. पाच वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल झाले आहेत त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती.

तसेच त्याच्यापासून जीविताचे आणि मालमत्तेचे नुकसान होईल या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करत नव्हते याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्ता अमिताभ गुप्ता यांनी दहशत निर्माण करणाऱ्या आणि सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे आत्तापर्यंत 87 गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले असून यापुढेही सराईत आणि अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे

Share This News
error: Content is protected !!