पुणे शहरात प्रतिबंधित पदार्थांसंदर्भात आणखी दोन ठिकाणी कारवाई

327 0

पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने पुणे शहरात दोन ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे ४ हजार ६०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन जणांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यामध्ये प्रथम खबरी अहवाल दिला असुन सर्वांना अटक करण्यात आली आहे.

पुणे कार्यालयास प्राप्त गोपनिय माहितीच्या अनुषंगाने मे. शिवम पान शॉप, रामटेकडी पुणे आणि मे. अमिना जनरल स्टोअर्स, गायकवाड सोसायटी राम टेकडी पुणे १३ या दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी पुणे विभागात बऱ्याच ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ संदर्भात कारवाया करण्यात आल्या आहेत.

पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थांची विक्री करू नये असे आवाहन करण्यात येत असून नागरिकांनी अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

Share This News
error: Content is protected !!