दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न निष्फळ, एसटी उलटली, सासवड जवळील घटना

15976 0

पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी आरटीओ कॉर्नर जवळ दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात राज्य परिवहन मंडळाची बस उलटली. या अपघातात एका मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे. 

एस टी बस पुण्याहून सासवडकडे येत असताना मोटरसायकल आणि बस यांच्यात धडक झाली. बस चालकाने दुचाकी चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीवरील एकजण मृत्युमुखी पडला. या प्रयत्नात एसटी उलटली.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. बसमध्ये २९ प्रवाशी होते. सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृताचे नाव समजू शकले नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!