#ACCIDENT : नवले पुलावर पुन्हा अपघात; डंपरची दुचाकीला धडक; दुचाकी स्वाराचा मृत्यू

853 0

पुणे : पुण्यातील नवले पुलावर भुमकर चौकात आज मोठा अपघात घडला आहे. एका भरधाव डंपरने एका दुचाकी स्वाराला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी स्वाराने कोलांट्या उड्या घेतल्या. या भीषण अपघातात या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर डंपरच्या चालकाने तिथून पळ काढला. पोलीस त्याचा तपास करत आहे.

नवले पुलावरील भूमकर चौकामध्ये या भीषण अपघातात दुचाकी स्वाराने प्राण गमावले आहेत. तर या डंपर चालकाने पळ काढला. डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Image Source – Google 

Share This News
error: Content is protected !!