ACB TRAP : पिंपरी चिंचवड महापालिकेचा कर्मचारी ACB च्या जाळ्यात ; 2 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या लाचेची मागणी

354 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील सर्व लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला आहे . संदीप लबडे असं लाच मागणाऱ्या सर्वेवरचं नाव असून , लबडे यांनी दोन लाखांची लाच मागितली होती. या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार , पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागामध्ये संदीप लबडे सर्वेवर म्हणून कार्यरत आहे. एका व्यक्तीकडे दोन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या लाचेची त्याने मागणी केली होती.

या लाचेची मागणी नक्की कोणत्या कामासाठी केली होती, याची सविस्तर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही . मात्र मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे . याप्रकरणी संदीप लबडे यांना ताब्यात घेण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!