दिल्लीच्या महापालिकेवर आपचा झेंडा; “सगळ्यांच्या सहकार्याने दिल्लीचा विकास करणार…!” – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

237 0

दिल्ली : दिल्ली महापालिकेवर वर्चस्व सिद्ध करण्यात ‘आप’ला यश मिळाले आहे. 250 पैकी 240 जागांचे निकाल लागले असून 134 जागांवर आम आदमी पक्षानं दणदणीत विजय मिळवला आहे. एकंदरीतच आपने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आता दिल्ली महापालिकेवर आपचा झेंडा फडकणार आहे. यावेळी सगळ्यांच्या सहकार्याने दिल्लीचा विकास करणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.

त्यामुळे पंधरा वर्षापासून भाजपने सत्ता गाजवलेल्या दिल्ली महापालिकेवर आता आपचे वर्चस्व असणार आहे. भाजपने 99 जागांवर ठाम राहून काँग्रेसला मात्र केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Share This News
error: Content is protected !!