Top News Marathi Special Report : आप, शिवसेना आणि आता शिंदे गट; कसा आहे दिपाली सय्यद यांचा राजकीय प्रवास

396 0

आपल्या दिल खेचक आदांनी मराठी सिनेसृष्टीत आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून पुढे राजकीय क्षेत्रात आपलं नशीब अजमावू पाहणाऱ्या दिपाली भोसले सय्यद यांनी शिवसेनेतील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करत बाळासाहेबांच्या शिवसेनेत अर्थात शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. निमित्ताने दिपाली सय्यद यांच्या राजकीय प्रवासावर नजर टाकणारा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट

मुंबईच्या कुर्ल्यात जन्म घेतलेली मराठमोळी अभिनेत्री दीपाली भोसले. दीपाली भोसलेंचं संपूर्ण बालपण मुंबईत गेलंय. दीपाली यांनी नालंदा विद्यापिठातून फाइन आर्टसची पदवी घेतली. त्यानंतर त्यांच्या करियरची सुरुवात ही अभिनय क्षेत्रातून झाली. जत्रा या मराठी चित्रपटातून त्या घराघरात पोहोचल्या पुढे 2014 मध्ये त्यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला अभिनय क्षेत्रातून राजकारणात येत असताना दीपाली सय्यद यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती.

2014 ला राजकारणात नवख्या असलेल्या दीपाली यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यावेळी आम आदमी पक्षाची महाराष्ट्रात फारशी चर्चा नव्हती. 2014 लाच त्यांनी आपकडून विधानसभेची निवडणूक लढवली. परंतु, या पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर दीपाली यांनी शिवसंग्राम या पक्षात प्रवेश केला. त्यावेळी देखील त्या जास्त चर्चेत नव्हत्या.

दीपाली सय्यद राजकारणात खऱ्या चर्चेत आल्या ते 2019 मध्ये. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून हातावर शिवबंधन बांधून घेतले. 3 ऑक्टोबर 2019 या दिवशी त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यानंतर लगेच झालेलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ठाण्यातील कळवा मुंब्रामधून राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात उमेदवारी मिळाली. पण जितेंद्र आव्हाड यांच्याकडून दीपाली सय्यद पराभूत झाल्या. त्यावेळी देखील या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ यांनी एकत्र यावं अशी भूमिका त्या सातत्याने मांडत होत्या. दिपाली सय्यद यांनी रश्मी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील अनेक महिला नेत्यांवर तसेच शिवसेनेची तोफ अशी ओळख असणाऱ्या संजय रावतांवर गंभीर आरोप करत आपण शिंदे गट अर्थात बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे जाहीर केलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!