आधार सक्षम पेमेंट सिस्टीम : आधार कार्ड ही भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाची आयडेंटिटी आहे. कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड विचारले जाते. त्यामुळे आज भारतामध्ये कुणाकडे आधार कार्ड नाही असं नसावेच. आणि जर तुमच्याकडे आधार कार्ड अजूनही नसेल तर ते हमखास बनवून घ्या कारण आता आधार कार्डच्या मदतीने तुम्ही पैसेही काढू शकता. त्याचबरोबर एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे देखील ट्रान्सफर करू शकता. ही आहे आधार सक्षम पेमेंट सिस्टीम ज्याद्वारे तुम्ही पैशांचा व्यवहार करू शकता.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आधार क्रमांकाच्या मदतीने आर्थिक व्यवहार करण्याची ही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीनुसार आधार क्रमांक, आयरिस स्कॅन आणि फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन करून घेऊन एटीएम द्वारे आर्थिक व्यवहारांना परवानगी देणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेचे तपशील देखील देण्याची आवश्यकता नाही. केवळ आधार कार्ड हे बँकेचे लिंक असणं मात्र आवश्यक आहे. एकदा का तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक झाले की तुम्हाला या प्रणाली अंतर्गत पैसे काढण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी ओटीपी किंवा पिन ची देखील आवश्यकता राहणार नाही.
या प्रणालीच्या मदतीने केवळ पैसे काढणे किंवा पाठवणे नाही तर बॅलन्स तपासणे पैसे, जमा करणे आणि आधार वरून निधी हस्तांतरित करणे या सेवांचा देखील समावेश करण्यात आला आहे. आता जाणून घेऊयात ही प्रणाली कशी काम करते. यासाठी तुमच्या बँकिंग करस्पॉन्डंटला भेट द्या. आता ओपीएस मशीनमध्ये 12 अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर पैसे काढणे केवायसी आणि शिल्लक चौकशी यासारख्या कोणत्याही सेवा निवडा आता बँकेचे नाव आणि तुम्हाला किती रक्कम काढायचे आहे ती रक्कम टाका आणि त्यानंतर बायोमेट्रिक व्यवहाराची व्हेरिफिकेशन करा आणि अशा पद्धतीने तुम्ही पैसे काढू शकता.