मतदान करावे म्हणून अनोखी शक्कल ! मतदानाची शाई दाखवा आणि मोफत चहा किंवा पुस्तक मिळवा; महिलांसाठी मोफत मेहंदी देखील काढून मिळणार

830 0

पुणे : तिथे काय उणे याची प्रचिती आज पुण्यामध्ये आली आहे. मतदान करण्यासाठी मतदारांनी घराबाहेर पडावं यासाठी उमेदवाराच्या समर्थकांनी अनोखा मार्ग शोधला आहे. मतदानाची शाई दाखवा आणि मोफत चहा मिळवा मतदानाची शाई दाखवा आणि मोफत पुस्तक घ्या अशी ऑफर मतदारांना करण्यात आली आहे. महिलांसाठी देखील विशेष ऑफर देण्यात आली आहे ती म्हणजे मतदान करा आणि हातावर मेहंदी काढून घ्या.

जास्तीत जास्त मतदात्यांनी घराबाहेर पडावं आणि मतदान करावं यासाठी अशी अनोखी सकल लढवण्यात आली आहे. दोन्हीही मतदारसंघांमध्ये मदत प्रक्रिया सुरू आहे. मतदारांना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अक्षरशः घराबाहेर काढून मतदान करण्याचा आवाहन करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!