मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच देण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन

211 0

पुणे : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयातर्फे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कालावधीत मागासवर्गीय प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी निवासी शाळा तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीच्या आश्रमशाळातील अनुसूचित जाती, अनसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग या प्रवर्गाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्याचे जातीचे दाखले शाळेमध्येच त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सेवा पंधरवडा कालावधीत या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!