स्वतःला बाळ होईना मंदिरातून पळवले अवघ्या सहा वर्षाच्या मुलाला; 90 CCTV व्हिडिओ धुंडाळून असे सापडले आरोपी

754 0

कोल्हापूर : कोल्हापुरातून एक अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिलेला स्वतःला अपत्यप्राप्ती होत नव्हती. या कारणाने तिने एका सहा वर्षाच्या मुलाचे मंदिरातून अपहरण केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 48 तासात या अपहरण करणाऱ्या जोडप्याला गजाआड केले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मोहन अंबादास शितोळे आणि छाया मोहन शितोळे असं अपहरण करणाऱ्या या दांपत्याचे नाव आहे. हे दोघे आरोपी साताऱ्यातील मेढा या गावचे रहिवासी असून त्यांना अपत्य प्राप्ती होत नव्हती. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या सुषमा नाईक नवरे यांच्या सहा वर्षाच्या मुलासह कोल्हापुरातील आदमापुर येथील बाळूमामा मंदिरात ून या बाळाचं अपहरण केलं होतं.

दरम्यान मंदिरातील सीसीटीव्ही फुटेच्या आधारे आणि तांत्रिक तपास करून पोलिसांनी अवघ्या 48 तासात या आरोपींना गजाआड केले आहे. मुलाची सुखरूप सुटका झाल्याने त्यांच्या घरच्यांनी सुटकेचा निष्वास सोडला आहे.

Share This News
error: Content is protected !!