शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती स्थिर, मुंबईच्या लीलावतीत उपचार सुरू

273 0

औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना काल सायंकाळी हृदयविकाराचा झटका आला. औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना तातडीनं एअर ऍम्ब्युलन्सनं औरंगाबाद येथून मुंबईला हलवण्यात आलं.

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार यांना काल सायंकाळी हृदयविकाराचा झटका आला. औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीनं मुंबईला हलवण्यास सांगितलं. त्यानंतर तातडीनं त्यांना एअर ऍम्ब्युलन्सनं औरंगाबाद येथून मुंबईला हलवण्यात आलं. त्यांच्यावर आता लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं.

Share This News
error: Content is protected !!