पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणी बाबत तातडीने नोडल ऑफिसरची नेमणूक करावी ; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचे निर्देश

410 0

मुंबई : पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे परीक्षा विभागाच्या विरोधात आंदोलन सुरू होते. याची माहिती मिळताच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने दखल घेऊन पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क केला आणि पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणी बाबत तातडीने नोडल ऑफिसरची नेमणूक करावी असे निर्देश दिले.

अधिक वाचा : डेंग्यूने घेतला महिला पोलीस आणि ओल्या बाळंतिणीचा जीव ; 10 दिवसांपूर्वीच दिला होता गोंडस बाळाला जन्म

पुढे बोलताना पाटील म्हणाले , विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत त्या वेळेतच विद्यापीठ प्रशासनाने सोडवल्या पाहिजे. यासाठी तातडीने नोडल ऑफिसर नियुक्त करावा त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेत सुटतील. असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!