‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी 70 लाख रुपयांची विदेशी दारू जप्त

335 0

पुणे : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक बॉक्स साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गोवा बनावटीची मद्य विक्रीसाठी आणलेली होती. या कारवाईमध्ये दोन मोठे कंटेनर व एक कार देखील जप्त करण्यात आली आहे.

या दोन मोठ्या कंटेनर सोबत एक कार त्यांनी पुढे तपासणीसाठी ठेवली होती. गोवा मधून हे कंटेनर जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्या कंटेनर्सला मोठे सील होते. आणि अशा सील असलेल्या कंटेनरची सहसा आत मधून तपासणी केली जात नाही. महाराष्ट्र गोवा व राजस्थान अशा तीन राज्यातील सात आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

हा साठा गोवा राज्यातून पुणे मार्गे पुढे कुठे जाणार होता, याबाबतची माहिती अजून मिळालेली नाही. पुढील तपास पोलीस पथक करत आहे.

Share This News
error: Content is protected !!