#CRIME : प्रियकराच्या पत्नीसोबत संबंध ठेवण्यासाठी प्रेयसीने संपवले प्रियकराचे आयुष्य; चौकशीतुन जे समोर आले त्याने पोलीसही चक्रावले

7461 0

पटना : पटना मधील दानापूर मधून एक विक्षिप्त घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी पवन राम या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा तपास सुरू असताना पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पवन राम यांच्या प्रेयसीनचं त्याची हत्या केल्याचं उघडकीस आलं होतं.

पण ही हत्या प्रकरण तेवढ साध सोप नव्हत. सुरुवातीला केवळ प्रियकराने तिच्याशी लग्न करावं पण तिचा विश्वासघात झाला असावा म्हणून तिने त्याची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज होता. पवन राम याचे लग्न झाले होते. परंतु तपास सुरू असते वेळी चौकशी अंती जे काही उघडकीस आले त्याने पोलीस देखील चक्राऊन गेले होते.

आरोपी महिला हिने दिलेल्या जबाबानुसार पवन राम हा तिचा प्रियकर होता. परंतु तिला पवन राम याच्या पत्नी सोबतच समलैंगिक संबंध ठेवायचे होते. परंतु पवन राम यानी विरोध केल्यामुळेच आरोपी महिलेने त्याची हत्या केली.

Share This News
error: Content is protected !!