सातारा : मेढा-महाबळेश्वर दरम्यान केळघर घाटात आज पहाटे दरड कोसळल्यानं काही प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.केळघर घाटात मोठमोठाले दगड व माती डोंगर माथ्यावरून वाहत येत रस्त्यावर दरड कोसळली मात्र स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी मोठमोठाले दगड बाजूला करत रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी सुरळीत केला.
रस्ता रुंदीकरण करताना संबंधित विभागानं याठिकाणी कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळं दरडी कोसळण्याचं प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आज घडलेल्या सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.