Breaking News

पुणे : आंबेगावातील जवानाला मध्यप्रदेशमध्ये वीरमरण; आज शासकीय इतमात अंत्यसंस्कार

489 0

पुणे : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील जवान सुधीर थोरात (वय वर्ष 32) यांना मध्य प्रदेश येथील ग्वाल्हेर मध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. ग्वाल्हेर येथे हॉर्स रायडिंग प्रॅक्टिस करत असताना मैदानामध्ये खाली पडलेला निशाणी झेंडा व्यवस्थित लावत असताना अचानक समोरून येणाऱ्या घोड्याची त्यांना धडक बसली. या धडकेमध्ये घोड्याची टाप त्यांच्या डोक्याला जोरात लागल्याने त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शहीद जवान सुधीर थोरात यांची बीएसएफमध्ये पोस्टिंग होती. ग्वाल्हेरमध्ये एका स्पर्धेसाठी गेलेले असताना ही घटना घडली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि अडीच वर्षाचा मुलगा आहे. आज त्यांच्या राहत्या गावी लौकी चांडोली येथे शासकीय इतमात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share This News
error: Content is protected !!