#ACCIDENT : लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात; नवरदेवासह पाच जणांचा दुर्दैवी अंत

1034 0

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश मधील हरदायी जिल्ह्यामध्ये शुक्रवारी भीषण अपघातामध्ये लग्नासाठी निघालेल्या नवरदेवासह कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी वऱ्हाडी मंडळी बोलेरो या गाडीमधून निघाले होते. एकीकडे नवरदेवाच्या स्वागतासाठी अभायन या गावामध्ये मुलीच्या घरी जोरदार तयारी सुरू होती. पण पचदेवरा क्षेत्रातील दरियाबाद गावाजवळ या वऱ्हाडी मंडळींच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका उसाच्या ट्रॅक्टरवर जीप जाऊन आदळली आणि त्यानंतर ओढ्यात कोसळली.

यामध्ये आठ जण गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये दोघा जणांचा अपघात स्थळी स्मृत्यू झाला होता. तर नवरदेव, वरपिता आणि चालक सुमित सिंह या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे.

Share This News
error: Content is protected !!