पुण्यात फिल्मी थरार ! मैत्रिणीशी बोलतो म्हणून पठाणचा नुमविमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

818 0

पुणे : पुण्यामध्ये आज फिल्मी सीनला शोभेल असे चित्र पाहायला मिळाले. अल्पवयीन मुलाने आज नुमवी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर तरुणाने हल्ला केला आहे. या मध्ये समीर पठाण याने विजय आरडे या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. समीर पठाण हा तुळशीबागेत आम करतो. विजय आरडे हा पठाण यांच्या मैत्रिणीशी बोलला याचा राग मनात धरून समीर पठाण यांनी विजय आरडे याच्यावर कोयत्याने हल्ला केला आहे.

यामध्ये विजय आरडे याच्यासह त्याच्या शेजारी उभा असलेल्या एक विद्यार्थी देखील जखमी झाला असल्याचे समजते. जखमीना वाहतूक पोलिसांनी तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!