मावळमध्ये थरार : चोरीच्या उद्देशाने उचकटले कपाट; आवाजाने जाग आली आणि मालकिणीचे रौद्ररूप पाहून चोरट्यांनी ठोकली धूम, पहा व्हिडिओ

678 0

(मावळ) पुणे : मावळमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेने नागरिक या महिलेच्या धाडसाचं कौतुक करत आहे. चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाट उघडत असताना झालेल्या आवाजाने घर मालकिणीला जाग आली. तिने आवाज येतो आहे त्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. आणि चोरांना पाहून थेट त्यांच्या अंगावर ओरडून धावून गेली.

मावळमधील तळेगाव दाभाडे येथे कडोलकर कॉलनी आहे. या कॉलनीत धनंजय वाडेकर आपल्या पत्नीसह राहतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाडेकर यांच्या घरामध्ये चोरी करण्याच्या इराद्याने चोर शिरले.एकूण पाच चोर धनंजय यांच्या घरात शिरले होते.

मालकिणीचे हे रौद्ररूप पाहून चोरट्यांनी तिथून धूम ठोकली आहे. यामुळे या चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला आहे. पण या महिलेच्या धाडसाचे देखील कौतुक होते आहे.

Share This News
error: Content is protected !!