अकरावीतील विद्यार्थ्याला शिक्षकांची अमानुषपणे लाथा बुक्क्यांनी मारहाण; शिक्षकांविषयी शेरोशायरी केल्याच्या गैरसमजातून घडला धक्कादायक प्रकार, व्हिडिओ व्हायरल

1027 0

आळेफाटा : शिक्षकांबाबत शेरोशायरी केल्याच्या गैरसमजातून शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला अमानुषपणे लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

आळेफाटा येथील ज्ञान मंदिर ज्युनिअर कॉलेज मधील हा प्रकार एका विद्यार्थ्याने कॅमेऱ्यामध्ये कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटीझंसनी टीकेची झोड उठवली आहे.

महाविद्यालयीन काळात मुलांनी शिक्षकांवर केलेली शेरोशायरी किंवा टीकाटिप्पणी हे आजपर्यंत आपण अनेक वेळा ऐकले आणि पाहिले असेल. पण शेरोशायरी केली म्हणून या शिक्षकांनी मुलाला थेट लाथा बुक्क्यांनी अक्षरशः तुडवले आहे. विद्यार्थ्यांचे केस पकडून त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, माझी चूक नाही अशी विद्यार्थ्यांना विनवणी करून देखील शिक्षकांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी आता विद्यालय प्रशासनानं बैठक बोलावली असून विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील विद्यालया विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Share This News
error: Content is protected !!