मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी पैसे वाटल्याच्या ऑडिओ क्लिपवर शिंदे गटाकडून स्पष्टीकरण ; म्हणाले …

260 0

आज पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होते आहे. परंतु ही सभा एका व्हायरल ऑडिओ क्लिप मुळे अधिकच चर्चेत आली आहे. या सभेसाठी गर्दी व्हावी यासाठी सुरुवातीला एक पत्र व्हायरल झालं होतं. ज्यामध्ये अंगणवाडी सेविकांना सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. आता एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये सभेला गर्दी जमावी यासाठी पैसे वाटले असल्याचं संभाषण असल्याचं म्हटलं जातंय.

या पत्रावरून वाद निर्माण झाला होता. दरम्यान हे पत्र बनावट असल्याचं औरंगाबाद जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सांगितलं होतं. पण त्यानंतर लगेचच आता एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये सभेला गर्दी जमावी यासाठी पैसे वाटले असल्याचं संभाषण असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान ही ऑडिओ क्लिप देखील बनावट असल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. कोणीतरी मुद्दाम ही क्लिप व्हायरल केल्याचं औरंगाबाद जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे. या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात असल्याच देखील त्यांनी म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!