BIG NEWS : भुसावळमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवकांचे निलंबन, वाचा सविस्तर

323 0

भुसावळ : भुसावळमधून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. भुसावळ नगरपालिकेमधील नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नऊ नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह अमोल इंगळे, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, मेघा वाणी, बोधराज चौधरी, शैलजा नारखेडे, प्रमोद नेमाडे, शोभा नेमाडे, किरण कोलते यांचे सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या नऊ जणांनी आपला नगरपालिकेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या विरोधात भाजप नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी नगरसेवकांची अपात्र याचिका दाखल केली होती. यावरच नगर विभागाचे प्रधान सचिव यांच्या सुनावणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. नगर विकास मंत्रालयाने या निकालाबाबत आदेश पारित केले आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादीला भुसावळमध्ये मोठा धक्का बसलाय. त्याचबरोबर नगराध्यक्ष रमण गोळे हे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे ही कारवाई एकनाथ खडसे यांना देखील मोठा धक्का आहे.

Share This News
error: Content is protected !!