काँग्रेसला मोठे खिंडार ! गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ 64 नेत्यांचा सदस्यत्वाचा राजीनामा

428 0

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी मागच्याच आठवड्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. गुलाम नबी आझाद हे लवकरच जम्मू-काश्मीर मधून राष्ट्रीय पातळीवर एक पक्ष सुरू करणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचे समजले जात असतानाच अगदी आठवड्याभरातच काँग्रेसला पुन्हा मोठे खिंडार पडले आहे.

अधिक वाचा : VIDEO : ‘ बापूजी को रिहा करो ‘ घोषणा फलकांसह आसाराम बापूच्या 5 हजार भक्तांचा पुण्यात मूक मोर्चा

गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ 50 हून अधिक वरिष्ठ नेते यांसह एकूण 64 नेत्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद, माजी मंत्री अब्दुल मजीद वाणी ,मनोहर लाल शर्मा ,घारू राम आणि माजी आमदार बलवान सिंह यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिला असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले . काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना संयुक्तपणे राजीनामा पत्र सादर करण्यात आले आहे.

अधिक वाचा : पुण्यात मानाच्या गणपतींविरोधात कायदेशीर लढाई ; ॲड. असीम सरोदेंमार्फत उच्च न्यायालयात याचिका

Share This News
error: Content is protected !!