आमदार बच्चू कडूंना मोठा धक्का; चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्था निवडणुकीत प्रहारचे केवळ तीन उमेदवार विजयी

364 0

चांदूरबाजार : 19 मार्चला चांदूरबाजार तालुका खरेदी विक्री संस्थेची निवडणूक पार पडली. १५ जागांच्या लढतीमध्ये निवडणुकीमध्ये प्रहारचे केवळ तीन उमेदवार निवडून आले आहेत. तर सहकार पॅनलचे 12 संचालक विजयी झाले आहेत. त्यामुळे हा बच्चू कडू यांना मोठा धक्का मानला जातो आहे.

19 मार्चला चांदुरबाजार तालुका खरेदी विक्री संस्थेच्या 15 संचालक पदासाठी निवडणूक पार पडली. तर सोमवारी मतमोजणी झाली आहे. या निवडणुकीमध्ये शेतकरी पॅनल आणि सहकार पॅनल यांच्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलचे 12 संचालक विजयी झाले आहेत. तर शिंदे गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!