शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे दुर्गाष्टमीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 5000 रक्तदात्यांचा सहभाग

388 0

पुणे : दुर्गाष्टमीनिमित्त दर महिन्याप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरात 5000 रक्तदानाचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून हे अठरावे रक्तदान शिबिर आहे. 

शंकर महाराज मठामध्ये आज भक्तांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी आहे. मोठ्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत. पद्मावतीपर्यंत दर्शन बारीची रांग आहे. पोलिसांनी मोठा फौज फाटा देऊन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण काळजी घेतली आहे. संध्याकाळी साडेचार ते साडेसहा मठामध्ये दुर्गाष्टमीचा पालखी सोहळा होणार आहे.

त्यानंतर आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे प्रकटदिन सोहळ्याचे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात आले आहे. त्यासाठी मठावर रोषणाई व फुलांची आरास करण्यात आली आहे. संध्याकाळी गणेश महाराज भगत हे शंकर महाराज प्रकट दिनानिमित्त पाळणा व कथा करणार असून आळंदीचे आभय महाराज टिळक यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!