MLA AMOL MITKARI : “50 खोके आणि एकदम ओके “.. ही घोषणा त्यांच्या जिव्हारी लागली , अधिवेशनाचे राहिलेले 2 दिवस ‘अरेरावीत’ घालवायचे होते…! VIDEO

328 0

मुंबई : आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये झालेल्या धक्काबुक्की आणि घोषणाबाजी नंतर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे या आमदारांमध्ये देखील जोरदार बाचावाची झाली. 

यावेळी पत्रकारांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की , “आमदारांमध्ये झालेली धक्काबुक्की हा सत्ताधाऱ्यांच्या दादागिरीचाच प्रकार आहे.  आमच्यासारख्या नवीन आमदारांवर अशा प्रकारची दादागिरी योग्य नसल्याचा देखील ते म्हणाले असून , महाविकास आघाडीची बैठक नुकतीच घेण्यात आली . यामध्ये शेतकरी विषयी मुद्दे मांडण्याकरिता एकत्र येण्याचे आदेश देण्यात आले होते . परंतु अधिवेशनाचे राहिलेले दोन दिवस अरेरावीत घालवायचे हेच त्यांचे नियोजन होते. ” असा आरोप देखील मिटकरी यांनी केला आहे.

तसेच “काय शिवीगाळ केली ते मी काय इथे बोलणार नाही. तुम्हाला जर कोणी शिवीगाळ केली तर त्याचं उत्तर दिलंच पाहिजे. फक्त त्याच भाषेत आम्ही त्यांना उत्तर दिलं नाही. त्यांनी दाखवलेली विकृती ही महाराष्ट्राने पाहिली आहे. नवखे आमदार जे आहेत त्यांना मी ओळखत नाही. 50 खोके आणि एकदम ओके.. ही घोषणा त्यांच्या जिव्हारी लागली. तुम्ही घेतले नाहीत तर उत्तर द्या ना. केसरकर फक्त प्रामाणिक निघाले, पण उरलेल्या 49 जणांचं काय”, असा सवाल देखील मिटकरी यांनी उपस्थित केलाय .

Share This News
error: Content is protected !!