‘थर्टी फर्स्ट’ च्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाची 24 पथके तैनात

292 0

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केले जाते. मात्र थर्टी फर्स्टच्या निमित्ताने शहर आणि परिसरात होणाऱ्या पार्ट्यांवर पुणे उत्पादन शुल्क विभागाकडून नजर ठेवली जाणार आहे. त्यासाठी 14 नियमित पथकांव्यतिरिक्त 10 विशेष पथके नेमण्यात आली आहेत.

शहरात आणि आसपासच्या परिसरात हॉटेल, पब, रिसॉर्टमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये मद्याचा पूर वाहतो. अनेक ठिकाणी राज्यात बंदी असलेल्या परराज्यातील दारूचा अवैध पुरवठा होतो. छुप्या पध्दतीने परराज्यातील दारू पुरवली गेल्यास राज्याचा महसूल बुडतो, अनेक ठिकाणी विना परवाना पार्ट्या होतात. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाकडून दारू वाहतूक आणि पार्ट्यांच्या ठिकाणी होणाऱ्या नियमभंगावर विशेष लक्ष राहणार आहे.

Share This News
error: Content is protected !!