उरण : एक विचित्र घटना उरण मधून समोर येते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलांन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने उरण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या चिमुकलीने घडलेल्या घटनेची माहिती आईला सांगितली आणि त्यानंतर कुटुंबीयांनी उरण पोलीस स्थानकामध्ये फिर्याद नोंदवली आहे. हा अल्पवयीन मुलगा आणि पाच वर्षाची हि चिमुकली हे शेजारी राहतात. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या दोन्हीही कुटुंबीयांची कसून चौकशी केली आहे. तसेच मुलीची आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार आहे.
या घटनेनंतर मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. चिमुकल्यांचं बालपण कुठेतरी हरवलं गेलंय ? याला जबाबदार सोशल मीडिया जेवढा आहे तेवढेच पालक देखील आहेत. मुलांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष द्या, मुलं टीव्ही, मोबाईल यावर नक्की काय पाहतायत याकडे देखील पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता लहान मुलांसाठी टीव्ही किंवा सोशल मीडिया पाहणंच होईल तितकं कमी करणे गरजेचे आहे.