अजित पवारांनी दिलेल्या अंबाबाईच्या मूर्तीसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या 1200 भेट वस्तूंचा होणार लिलाव

593 0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्तापर्यंत मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होणार आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम ही ‘नमामिगंगे’ अभियानाला देण्यात येणार आहे. नमामि गंगे या अभियाना अंतर्गत गंगा नदीचे संरक्षण करण्यात येते. या हेतूनेच या सर्व भेटवस्तूंचा लिलाव करून ही रक्कम गंगा नदी संरक्षणासाठी दिली जाणार आहे. या लिलावामध्ये कोणीही भाग घेऊ शकणार आहे. 17 सप्टेंबर पासून या लिलावास सुरुवात होणार असून नवी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मध्ये हा लिलाव सोहळा पार पडणार आहे.

त्यासह मेडल विजेत्या खेळाडूंच्या स्वाक्षरीचे टी-शर्ट ,बॉक्सिंग ग्लोज, रॅकेट्स सारखे स्पोर्ट्स साहित्य या लिलावात ठेवण्यात येणार असल्याचे समजते. तसेच आयोध्या श्रीराम मंदिर आणि वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराची रिप्लिकादेखील ठेवण्यात येणार आहे. तसेच 2020 ओलंपिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांनी पंतप्रधानांना दिलेल्या भेट वस्तूंपैकी क्रीडा साहित्य आणि उपकरणांचा देखील या लिलावामध्ये समावेश आहे.

तर टोकियो मध्ये 2020 साली झालेल्या ऑलंपिक गेम्स मध्ये नीरज चोप्रा यांनी वापरलेला भाला देखील लिलावात ठेवण्यात येणार असून या भाल्याची किंमत सर्वात अधिक असल्याचे देखील बोलले जाते आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांनी ट्विटच्या माध्यमातून या लिलावा संदर्भात माहिती दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!