मोठी बातमी : पंढरपूरला निघालेल्या 12 वारकऱ्यांना कारची जोरदार धडक; भीषण अपघातात 6 वारकरी जागीच ठार

663 0

पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळानं घाला घातला आहे दिंडीमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात सहा वारकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या दिंडीमध्ये एक कार घुसली. या कारने सहा जणांना चिरडले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथे काही भाविक कार्तिकी यात्रेसाठी पायी निघाले.  जुनोनी गावाजवळ भरधाव वेगाने आलेल्या एका कारने बारा वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये सहा जण जागीच ठार झाले. तर सहा जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!