WhatsApp

WhatsApp : आता इतरांना दिसणार नाही तुमचा मोबाईल नंबर; WhatsApp चे नवीन फीचर लाँच

274 0

व्हॉट्सअ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप (WhatsApp) जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या यूजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सातत्याने नवनवीन फीचर लाँच करत असतं. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपने कम्युनिटीज (WhatsApp) हे फीचर लाँच केले होते. या फीचरमध्ये आता एक मोठे अपडेट येणार आहे. यामध्ये ते यूजर्सचा फोन नंबर अनोळखी व्यक्तींना मिळू नये, यासाठी नवीन फीचर लाँच करणार आहे.

Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी घाटात ST बस दरीत कोसळली; 15 जण जखमी

WABetainfo या वेबसाईटने याची माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप ‘फोन नंबर प्रायव्हसी’ या फीचरची चाचणी घेत आहे. यामुळे तुम्ही एखाद्या कम्युनिटीमध्ये जॉईन झाला असाल, तरीही कम्युनिटीमधील इतर सदस्यांना तुमचा नंबर दिसणार नाही अशा प्रकारचे हे फीचर आहे.

Accident News : समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; 20 जण जखमी

अगदी तुम्ही एखाद्या मेसेजला रिअ‍ॅक्शन दिली, तरीही तुमचा नंबर इतरांना दिसणार नाही. केवळ कम्युनिटीचे अ‍ॅडमिन (WhatsApp) आणि ज्यांनी तुमचा नंबर सेव्ह केला आहे, अशाच व्यक्तींना तुमचा नंबर दिसेल अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच जर तुम्ही कम्युनिटी अ‍ॅडमिन असाल, तर तुमचा फोन नंबर सर्वांना दिसणार आहे. सध्या हे फीचर केवळ बीटा यूजर्ससाठी उपलब्ध आहे. मात्र, टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!