Jio Laptop

Jio : जिओकडून 20 हजार पेक्षाही स्वस्त लॅपटॉप लाँच

522 0

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ (Jio) कंपनीने आज मार्केटमध्ये स्वस्त आणि मस्त लॅपटॉप लाँच केला आहे. Reliance JioBook हा 4G इनेबल्ड लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये असे काही फीचर्स आहेत जे महागातील महाग लॅपटॉपलाही तगडी टक्कर देऊ शकतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या लॅपटॉपची किंमत 20 हजार रूपयांपेक्षा कमी आहे.

Reliance JioBook 4G लॅपटॉपचे फीचर्स
या लॅपटॉपमध्ये 4G LTE, वायफाय, ब्लूटूथ 5.0, एचडीएमआई पोर्ट, 3.5mm ऑडियो जॅक आणि ड्युअल सिम सपोर्ट हे फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या लॅपटॉपचे वजन 999 ग्रॅम इतके आहे. तर या लॅपटॉपची किंमत 16 हजार 499 रूपये इतकी आहे. ग्राहकाचे बजेट लक्षात घेता कंपनीने हा स्वस्त लॅपटॉप लॉंच केला आहे.

JioBharat 4G स्मार्टफोन
Reliance Jio काही दिवसांपूर्वीच JioBharat 4G स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनची किंमत 999 रूपये इतकी आहे. फोनमध्ये एचडी कॉलिंग, यूपीआई पेमेंट आणि जिओ सिनेमा यासारख्या OTT प्लेटफॉर्म्सचे अ‍ॅक्सेस असे फीचर्स देण्यात आले आहेत.

Share This News
error: Content is protected !!