Rain Alert

आता मोबाईल ,टीव्हीवर मिळणार चक्रीवादळ, पावसाचा अलर्ट; जाणून घ्या नवीन तंत्रज्ञान

292 0

हल्ली निसर्गचक्र बदललं आहे. त्यामुळे चक्रीवादळ (Hurricane), अवेळी पाऊस (Rain) यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. आणि बऱ्याचदा याची आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे आपली मोठ्या प्रमाणात हानी होते. या गोष्टीसाठी राष्ट्रीय व्यापस्थापक प्राधिकरण यासाठी प्रयत्नशील असते. मात्र आता आपल्याला चक्रीवादळ, पाऊस येणार असल्याची पूर्वसूचना मोबाईल आणि टीव्हीवर मिळणार आहे.

अत्याधुनिक वेधशाळांमुळे मोठ्या चक्रीवादळाबाबत अधिक सूचना मिळतात त्यामुळं यंत्रणांना पुरेशा तयारीसाठी वेळ मिळतो. परंतु नागरिकांनाही याची आधीच माहिती दिली तर पुरेशी खबरदारी घेतल्यानं त्यांचेही नुकसान टाळता येईल, या हेतूनं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं चक्रीवादळ, खराब हवामान किंवा मुसळधार पाऊस याबाबत प्रत्येकाला मोबाईलवर एसएमएस द्वारे अलर्ट देण्याची सुविधा सुरू केली जाणार आहे. आता हे अलर्ट तुम्हाला कसे मिळतील आणि हे सतर्क होण्यास तुमची मदत कसे करतील चला जाणून घेऊया…

1) आपण बाहेर कुठे प्रवासात किंवा कार्यालयात नसून घरी असाल, टीव्ही पाहत असाल किंवा रेडियोवर गाणी ऐकण्यात मग्न असाल तरी तुम्हाला हा अलर्ट देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

2) टीव्ही पहात असाल तर अचानक स्क्रीनवर खराब हवामानाचा अलर्ट झळकू लागेल. तुम्ही रेडियोवर गाणी ऐकत असाल तर अचानक गाणे मध्येच बंद होऊन तुम्हाला अलर्टची माहिती ऐकायला मिळेल.

3) यामुळे अलर्ट मिळताच नागरिक सावध होऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकतात. तसेच हीच माहिती मित्र,परिवार, नातेवाईकांना देऊन त्यांना सावध करता येईल. तसेच संकटाची तीव्रता लक्षात घेता बचावासाठी लागणाऱ्या सामग्रीची जुळवाजुळव करता येईल.

4) सध्या केवळ मोबाईलवर जोरदार पाऊस,वादळ,सोसायट्याचा वारा आदींबाबत मेसेजेस पाठवने सुरु केले आहे अशी माहिती एनडीएमएने दिली आहे.

5) वर्षभरात ही यंत्रणा पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात येईल आजवर एनडीएमए कडून ‘नॅशनल डिझास्टर अलर्ट पोर्टल’ द्वारे तसेच ‘सचेत’ या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे खराब हवामानाबाबत अलर्ट जारी केले जात होते. तमिळनाडूमध्ये पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर 2021 मध्ये केंद्र सरकारने अलर्ट देण्याची यंत्रणा देशपातळीवर सुरू करण्याचा निर्णय घेतल होता.

6) मोबाईलवर दिले जाणारे अलर्ट (Alert) स्थानिक भाषेसह दोन भाषेत दिले जावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही काळानंतर हा अलर्ट प्राप्त होताच मोबाईल व्हायब्रेट होऊ लागतील यावरही काम सुरू आहे. तेव्हा नागरिकांना हवामान बाबत वेळीच अलर्ट दिल्याने त्याना सतर्क होण्यास मदत मिळणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!