फेसबुक (Facebook) पुढील महिन्यात आपली एक सेवा बंद करणार आहे. नव्या युजर्सला याचा वापर करता येणार नाही. मात्र, जुने युजर्स हे ॲप वापरू शकतात. फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी Meta ने हा मोठा निर्णय घेतला आहे. मेटा कंपनी आपला एक महत्त्वाचं ॲप बंद करणार आहे.
कोणती सेवा बंद करणार?
फेसबुकने ऑक्टोबर 2016 मध्ये Messenger Lite ॲप लाँच केले होते. हे ॲप कमी स्पेस असलेल्या ॲण्ड्रॉईड फोनसाठी लाँच केले होते. त्यानंतर हे ॲप सगळ्याच स्मार्टफोनसाठी लाँच करण्यात आले. आता मेटा हे मेसेंजर लाईट ॲप बंद करणार आहे. अनेकांना हे ॲप ओपन केल्यानंतर Messenger ॲपचा वापर करण्याची सूचना येत आहे.
कधी बंद होणार हे ॲप
Messenger Lite ॲप हे 18 सप्टेंबरनंतर बंद होणार आहे. हे ॲप नव्या युजर्ससाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध नसणार आहे. मात्र जुने युजर्स मात्र हे ॲप वापरू शकतात. Messenger Lite मध्ये काही महत्त्वाचे फीचर्स होते. या ॲपची साइज 10 एमबी होती. मोबाईलमध्ये कमी स्पेस असलेल्या युजर्ससाठी Messenger Lite हे ॲप खूप फायदेशीर होते. तसेच लो इंटरनेट स्पीडवरही Messenger Lite काम करत होते. या ॲप डेटादेखील कमी लागत होता.