GST

GST News : खुशखबर..! मोबाईल,टीव्ही,फ्रीज होणार स्वस्त…

588 0

नवी दिल्ली : नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जीएसटी (GST News) कमी केला आहे. त्यामुळे लवकरच काही वस्तूंच्या दरात घट होताना दिसणार आहे. आता त्या वस्तू कोणत्या आहेत आणि जीएसटी (GST News) किती टक्क्यांनी कमी होणार आहे चला तर मग जाणून घेऊया….

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या अंमलबजावणीला नुकतेच सहा वर्ष झाली त्यानंतर सरकारन लोकांना गुड न्यूज दिली आहे. काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवरील जीएसटी सुमारे 19 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. त्यामुळं मोबाईल रेफ्रिजरेटर अनेक उपकरण स्वस्त झाली आहेत. नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्याची ज्यांची योजना आहे त्यांना फायदाच होणारे या वस्तूंवर ३ ते 19 टक्क्यांपर्यंत जीएसटी घटवली आहे जीएसटी (GST News) घटवल्यामुळे उत्पादनाच्या किमती देखील लवकरच कमी होईल अशी शक्यता आहे. गिझर,पंखे,कुलर,फ्रीज,वॉशिंग मशीन,मिक्सर ज्युसर,व्हॉक्यूम क्लीनर, मोबाईल या गोष्टी स्वस्त होणार आहेत.

Sangli News : सांगलीतल्या शेतकऱ्याचं पवार प्रेम; चक्क बैलाच्या अंगावर रेखाटली साहेबांची कलाकृती

वस्तूंचा आधीचा कर आणि नवीन कर यामध्ये काय फरक आहे
27 इंचापर्यंतचे टीव्ही
आधीचा कर 13.3 टक्के
नवा कर 18 टक्के .

रेफ्रिजरेटर
आधीचा कर 31.3 टक्के
नवा कर 18 टक्के

वॉशिंग मशीन
आधीचा कर 31.3 टक्के
नवा कर 18 टक्के

इलेक्ट्रिकल वस्तू
आधीचा कर 31.3 टक्के
नवा कर 18 टक्के

गिझर पंखे कुलर
आधीचा कर 31.3 टक्के
नवा कर 18 टक्के

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव; सुनील प्रभूंकडून कोर्टात याचिका दाखल

एलपीजी शेगडी
आधीचा कर 21 टक्के
नवा कर 18 टक्के

एलईडी
आधीचा कर 15 टक्के
नवा कर 12 टक्के

शिलाई मशीन
आधीचा कर 16 टक्के
नवा कर 12 टक्के

युपीएस
आधीचा कर 28 टक्के
नवा कर 18 टक्के

केरोसीन प्रेशर कंदील
आधीचा कर 8 टक्के
नवा कर 5 टक्के

व्हॅक्युम फ्लाक्स
आधीचा कर 28 टक्के
नवा कर 18 टक्के

मोबाईल फोन
आधीचा कर 31.3 टक्के
नवा कर 12 टक्के

सरकारन नागरिकांना दिलेल्या या गुड न्यूज मुळे आता कुठेतरी नागरिकांना महागाईच्या झळेतून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!