मुंबई : केंद्र सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याच्या सुविधेमध्ये वाढ केली आहे. UIDAI द्वारे जारी केले जाणारे हे डॉक्यूमेंट अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जून 2023 पर्यंत होती, ती आता वाढवून 14 सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे. UIDAI कडून हि माहिती देण्यात आली आहे.
आधार ऑनलाइन कसे अपडेट कराल?
1) सर्वात आधी आधारच्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
2) त्यानंतर वर myAadhaar हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3) त्यानंतर तुम्हाला “Update Aadhar” विभागात जावे लागेल. यानंतर यूजरला आपला आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड टाकावा लागेल.
4) त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP च्या मदतीने लॉग इन करता येईल.
5) यानंतर पत्ता, फोन नंबर, नाव किंवा जन्मतारीख यांचा तपशील द्यावा लागेल.
6) मग अपडेट करायच्या डेटासंबधित इतर कागदपत्रांची हार्ड कॉपी अपलोड करावी लागेल.त्यानंतर कन्फर्म आणि सबमिट बटणावर क्लिक करा.अशा प्रकारे तुमचे ऑनलाइन आधार अपडेट होईल.
आधार अपडेट झाले कि नाही ते कसे ट्रॅक करावे?
जेव्हा तुम्ही आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्याची रिक्वेस्ट सबमिट करता तेव्हा तुम्हाला एक URN नंबर दिला जातो. तो तुमच्या स्क्रीनवर दिसेल आणि तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल. आता तुम्ही https://ssup.uidai.gov.in/checkSSUPStatus/checkupdatestatus वर जाऊन तुमच्या आधार कार्ड अपडेट स्टेटस चेक करू शकता.