Twitter And Whats App

Twitter आता Whatsapp ला देणार टक्कर! आणलं ‘हे’ जबरदस्त फिचर

549 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्विटरच्या (Twitter) एका फिचरची मागच्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. अखे कंपनीने हे फिचर आता लाइव्ह केलं आहे. हे फिचर आता सर्व युजर्ससाठी उपलब्ध झालं आहे. ऑगस्ट महिन्यात ट्विटरचे सीईओ लिंडा याकारिने यांनी लवकरच ट्विटरवर ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल फिचर मिळेल आणि युजर्स फोन नंबरशिवाय एकमेकांशी बोलू शकतील अशी माहिती दिली होती. हे नवं फिचर डीएम म्हणजेच डायरेक्ट मेसेज पर्याया अंतर्गत मिळणार आहे. तसंच युजर्सना स्पॅम कॉलचा त्रास होऊ नये यासाठी काही निर्बंधदेखील लावले आहेत.

स्पॅम कॉल टाळण्यासाठी दिले आहेत 3 पर्याय
ट्विटरच्या ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल फिचरचं अली व्हर्जन एलॉन मस्कने ट्विटरच्या माध्यमातून शेअऱ केलं आहे. ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल फिचर ऑन करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी अँड सेफ्टी पर्यायावर जावं लागेल. तिथे तुम्हाला डायरेक्ट मेसेजवर क्लिक करत व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलिंग पर्याय ऑन करावा लागेल. जर हे फिचर तुमच्या अकाऊंटवर लाईव्ह असेल तर ते तुम्हाला दिसेल. किंवा तुम्हाला त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.

हे फिचर ऑन करताच तुम्हाला कोण कॉल करु शकतं हे तुम्ही ठरवू शकता. तुम्ही ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल फक्त आपले संपर्क किंवा ज्यांना फॉलो करता किंवा जे व्हेरिफाइड आहेत त्यांच्यापुरतं मर्यादित ठेवू शकता. ट्विटरवर आलेलं ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल फिचर व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामप्रमाणेच आहे. म्हणजे याचं इंटरफेस एकसारखंच आहे. तुम्हाला उजव्या बाजूला वरती ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलचा पर्याय मिळतो.

Share This News
error: Content is protected !!