Karnataka Congress : लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचे काँग्रेस सरकार कोसळणार; ‘या’ भाजप नेत्याचा मोठा दावा
बेळगाव : कर्नाटकमधील काँग्रेस सरकार (Karnataka Congress) पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार पक्षांतर्गत मतभेदामुळे पडेल,असा दावा विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला आहे. रविवारी बेळगाव येथील गांधी भवनमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उद्देशून ते बोलत होते. सिद्धरामय्या काहीही झाले तरी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. तर दुसरीकडे डी.