“शिवसेना संपण्याच्या मार्गावर ; देशात फक्त भाजप टिकेल…!” जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याने नवीन वादंग
नवी दिल्ली : देशातून अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शिवसेना संपण्याच्या मार्गावर असून, इतर प्रादेशिक पक्षही लयाला जातील आणि फक्त भाजप टिकेल, असा दावा करून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आह़े. शिवसेनेसह अन्य प्रादेशिक पक्षांनी नड्डा यांना लक्ष्य केल़े भाजप हा भक्कम वैचारिक पाया असलेला पक्ष असून