अमृत महोत्सवानिमीत्त हडपसर येथे ‘नगर वन उद्यान’ उभारणीचा शुभारंभ
पुणे:‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ निमित्ताने केंद्र शासन पुरस्कृत योजनेतून पुणे वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत महंमदवाडी तसेच हडपसर येथे ‘नगर वन उद्यान’उभारणीचा शुभारंभ पुणे वनवृत्ताचे मुख्य वनंसरक्षक एन. आर. प्रविण यांच्या अध्यक्षतेखाली व पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’निमित्ताने केंद्र शासन पुरस्कृत ‘नगर वन उद्यान’ उभारण्याची योजना आहे. या अनुषंगाने पुणे वन विभागाच्या अखत्यारित