पुणे : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने ८८ आस्थापनांवर कारवाई
पुणे : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने दिवाळीनिमित्त १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित तपासणी मोहिमेत वजने व मापांचे विहित मुदतीत फेर पडताळणी व मुद्रांकन न केलेल्या तसेच आवेष्टित वस्तू नियमांचे उल्लंघन केलेल्या एकूण ८८ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. वैध मापन शास्त्र अधिनियम २००९ तसेच त्या अंतर्गत महाराष्ट्र वैध मापन शास्त्र (अंमजबजावणी)